झी मराठी वाहिनी, माझी आवडती वाहिनी आहे. यावरील कार्यक्रम खरचं बरेच काही शिकवतात.. झी मराठी, मी मराठी अशी टॅगलाईन असणारी ही वाहिनी अनेक कार्यक्रमांचा संच प्रेक्षकांसमोर सादर करत असते. त्यात जुळून येति रेशीमगाठी, जय मल्हार, नांदा सौख्य भरे, पसंत आहे मुलगी, सौभाग्यवती, होणार सून मी या घरची यांसारखे अनेक कार्यक्रम आहे. त्यात मला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आवडतो.
१० वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंदाचा, चैतन्याचा एक झरा वाहतोय,
ज्याच्या दिवसागणिक मनोरंजनाच्या कक्षा रुंदावत जात आहेत. ‘दार उघड बये दार
उघड’ असे म्हणत दररोज संध्याकाळी ६.३० वाजता आनंदाची उधळण करीत झी मराठीवर
‘होम मिनिस्टर’ घेऊन येतात महाराष्ट्राचे लाडके ‘आदेश भाऊजी’. महिलांना
स्वतःचा असा आपला वाटणारा हा दूरचित्रवाणीवरील पहिलावहिला कार्यक्रम. १०
वर्षात कार्यक्रमाची अनेक पर्व पार पडली. प्रत्येक पर्वात महाराष्ट्रातील
घराघरातून मिळालेले प्रेम खूप मोलाचे होते. ‘होम मिनिस्टर’ने फक्त सुखाची
दारं उघडून दिली नाहीत तर त्या त्या घरातील दुःखांवर मायेची फुंकरही घातली.
लोकप्रिय अभिनेत्यांच्या घरापासून ते सर्वसामान्य वहिनींच्या घरात हा
कार्यक्रम प्रत्येक घरात सुखाने नांदला.
कधी वहिणीसोबत तर कधी अनेक दिग्गजांसोबत खेळले जाणारे विविध खेळ, पैठणीचे रंग, घराची सजावट, ठिकाणांनुसार भाषेचा बदलत जाणारा लहेजा या सर्व सुखद गोष्टींचा अनुभव होमी मिनिस्टर या कार्यक्रमामुळे येतो. सुख, दुःख, मनोरंजन, मज्जा-मस्ती, ज्ञान या सर्वांचा मिलाप साधणारा होमी मिनिस्टर हा कार्र्यक्रम खरचं पाहण्यासारखा आहे.
झी मराठी अशीच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात बहरत जावो व तमाम मराठी
मुलुखाचा अभिमान व स्वाभिमान आपण जपत महाराष्ट्रासह देशभरातीलचं नव्हे तर
जगभरात आपल्या वाहिनीचा व कार्यक्रमाचा नावलौकिक वाढीस लागो हीच ईश्वरचरणी
प्रार्थना….!
किशोरी यशवंत घायवट
No comments:
Post a Comment